Header Ads

विना अनुदानीत मध्ये हाल सोसणारे शिक्षक माझ्या पाठीशी ; डॉ निलकंठ खंदारे




सांगली : गेली 20 वर्ष विना अनुदानित शाळा महाविद्यालयात काम करणारे शिक्षक प्राध्यापक अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन व्यथित करत आहेत त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा उघड्या डोळ्यांनी राज्यकर्ते पाहत राहिले. ना त्यांच्या बद्दल कणव ना कळवळा ना त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याची चिंता राज्यकर्त्यांनी केली.त्यांचे आयुष्य ज्यांनी कवडीमोल केले,त्या राजकीय पक्षांना पुणे पदवीधर निवडणुकीत अजिबात मतदान मिळणार नाही,ते शिक्षक माझ्या पाठीशी आहेत,असे प्रतिपादन निलकंठ खंदारे यांनी केले.






डॉ.खंदारे पुढे म्हणाले,हा विना अनुदानित शिक्षक वर्ग हा सर्वात अधिक शोषित असून मी त्या प्रश्नावर अत्यंत संवेदनशील रित्या पाहत आहे.मात्र केवळ राजकीय अजेंडा राबवून हे प्रश्नच पुढे येऊ द्यायचे नाहीत हे धोरण ठेवल्याने अशा राजकीय पक्षाच्या उमेदवारांना विना अनुदानित शिक्षक अजिबात मतदान देणार नाहीत,असे आपण जिथे जाईल तिथल्या शिक्षकांनी सांगितले आहे.







पदवीधर मतदारसंघात प्रश्नांची मालिका तशीच असून यासाठी प्रामाणिक प्रयत्न पदवीधर आमदारांकडून केले गेले नाहीत,आपण निवडून आल्यास विना अनुदानित शिक्षकांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या शिक्षक आमदारासोबत आपण हा प्रश्न सोडविण्यासाठी सगळी शक्ती पणास लावून त्यांना न्याय मिळवून घेण्याची आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. निलकंठ खंदारे यांनी दुसरा दौरा सुरू केला,असून होम टू होम मतदार संपर्क सुरू आहे. त्यांना पुणे पदवीधर मतदार संघात मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.