Header Ads

लॉकडाऊन काळातील विजबिल माफ करा ; स्वा.शेतकरी संघटना

संख : लॉकडाऊनच्या काळातील घरगुती,कमर्शियल व शेती पंपाचे‌ अन्यायी वीज बिल माफ करावे,अशी मागणी स्वा.शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.तसे निवेदन उप कार्यकारी अभियंता, संख यांना दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,लॉकडाऊन काळात आर्थिक संकट संख परिसरात कोसळले आहे.अशात अव्वाच्या सव्वा आलेली विजबिले भरणे नागरिक,लघुउद्योग, शेतकऱ्यांना भरणे अशक्य झाले आहे.


अन्यायी विज बिल माफ करावे,या मागणीसाठी स्वा.शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.तरीही सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे जोपर्यत संपूर्ण वीज बिल माफ होत नाही.तोपर्यत एक रूपयाही भरणार नाही,कर्मचाऱ्यांनी बिलासाठी जबरदस्ती,वीज तोडण्याचे प्रकार झाल्यास सहन केले जाणार नाहीत.असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी स्वा.शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.संख : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे,मागणीचे‌ निवेदन देण्यात आले.

Blogger द्वारे प्रायोजित.