डफळापूर‌-अंनतपूर रस्त्याच्या कामास सुरूवात
डफळापूर, वार्ताहर : डफळापूर-अंनतपूर मार्गाच्या‌ दुरूस्तीच्या कामास अखेर सुरूवात करण्यात आली आहे.याबाबत दैनिक संकेत टाइम्सने आवाज उठवला होता.वस्तूनिष्ठ विषयाला वाचा फोडत भष्ट्र यंत्रणेचा भांडाफोड केला होता.महाराष्ट्र-कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या या रस्त्याचे अनेक वेळा काम झाले.


प्रत्येक वेळी ते निकृष्ट झाले आहे.यावेळी गेल्या महिन्यात‌ मोठ्या प्रमाणात पाऊस‌ पडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.अवजड वाहनामुळे त्यांचा घेर पाच,पाच फुर्टापर्यत वाढला आहे.मिरवाड तलाव ते गणेश डेअरीकडेच्या मार्गापर्यतच्या रस्त्याच्या दुरूस्तीला अद्याप सुरूवात‌ झालेली नाही.निकृष्ट काम,फायबर केबल मुळे रस्त्याची वाट लागली आहे.आता गावापासून पुढे कोळी वस्तीपर्यतचे काम सुरू करण्यात आले आहे. खाली मुरमीकरण,त्यावर खडीकरण,कारपेट अशी कामे करण्यात येणार आहे. 
डफळापूर-अंनंतपूर रस्त्याचे काम अखरे सुरू झाले आहे.