Header Ads

लकडेवाडीत दिव्यांग विद्यार्थ्यांस साहित्य वाटप;पालकातून समाधान

सोन्याळ,वार्ताहर : जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा लकडेवाडी ता जत येथील अपंग समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भीमराव लकडे व मुख्याध्यापक सिद्धेश्वर कोरे यांच्याहस्ते  दिव्यांग विद्यार्थ्यांस साहित्य वाटप करण्यात आले. यानंतर दिव्यांग विध्यार्थ्यांच्या पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.दरवर्षी अपंग समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत जत पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी आर.डी.शिंदे व जाडरबोबलाद केंद्राचे केंद्रप्रमुख बी बी बडीगेर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येते. जत तालुक्यात 2019-20 च्या यू-डायसनुसार व सर्वेक्षणानुसार अनेक दिव्यांग विद्यार्थी  आढळले आहेत. 








यातील लकडेवाडी येथील शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना आज विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. शिक्षण विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम अंतर्गत तपासणी करण्यात येते. यूडायस अंतर्गत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना तालूका व  जिल्हास्तरावर यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या आल्मीको मोजमाप शिबिर अंतर्गत तपासणी करुन त्यांना आवश्यक असलेले साहित्याचे मोजमाप घेण्यात आले होते. प्राथमिक शिक्षण विभाग कार्यालयाकडे प्राप्त साहित्य वाटप यादीनुसार तालुक्यातून बहुविकलांग, मतीमंद, कर्णदोष, सी.पी., अंध व अस्थिव्यंग असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती यावेळी अपंग विभागाकडून देण्यात आली़. विद्यार्थ्यांना सीपीचेअर, रोलेटर, व्हिलचेअर, एमआर कीट आदी गरजेच्या साधनांचे वाटप करण्यात आले़.







यावेळी लकडेवाडी मुख्याध्यापक सिद्धेश्वर कोरे म्हणाले की, या दिव्यांग विद्यार्थ्यांना गरजेनुसार साहित्याचे वाटप करण्यात येते.शासनाचे दिव्यांगासाठी हे स्तुत्य उपक्रम असून ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा.तसेच दिव्यांगांना व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी व अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. यावेळी शिक्षक लखन होनमोरे, दादासाहेब कोडोलकर, नितीन ऐवाळे व पालक उपस्थित होते.जत पंचायत समिती गट साधन केंद्रातील विशेष तज्ञ विशाल चिपडे, राजू सुतार, अपंग विशेष शिक्षक अविनाश काळे, अविनाश माने, विद्या देशमुख, संभाजी माळी, स्वप्निल देवकर, बाळू गेजगे यांचे सहकार्य लाभले.








सोन्याळ : दिव्यांग विध्यार्थ्यास व्हीलचेअर व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक व पालक उपस्थित होते.


Blogger द्वारे प्रायोजित.