Header Ads

जतेत नवीन जागेत बसस्थानक उभारण्याची मागणी

जत,प्रतिनिधी : जत शहरातून जाणारे विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर तसेच मंगळवेढा ऐगळी या राज्यमार्गावरील मोक्याच्या ठिकाणी जत आगाराची एस.टी. परिवहन विभागाची जागा असून या जागेवर बी.ओ.टी. मधून  अद्यावत असे शाॅपिंगमाॅलसह सर्व सोईनेयुक्त बसस्थानक उभे करण्यासाठी जतचे क्रियाशील आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी जत येथिल सामाजिक कार्यकर्ते व शिवनेरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यानी केली आहे.
कुंभार म्हणाले की,आपल्या शेजारील कर्नाटक राज्यातील आपल्या तालुक्याच्या सिमेलगतची सर्वच  परिवहन  विभागांतर्गत असलेली  बसस्थानके अद्यावत व सर्व सोईनेयुक्त अशी नव्याने उभारली आहेत.जत बसस्थानकाची अवस्था तर फारच बिकट झाली असून या स्थानकावर प्रवाशांचे सोइपेक्षा गैरसोईच जास्त आहेत. या बसस्थानकाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा,अशी झाली आहे.जत तालुक्यातील एकूण गावाचा विचार केला तर जतला सर्व सोईनेयुक्त असे अद्यावत बसस्थानक यापूर्वीच होणे अपेक्षित होते. पण याकडे कोणीही लोकप्रतिनिधीनी गांभीर्याने लक्ष दिले नाही.त्यामुळे हा बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबीतच राहीला आहे.


 
जत एस.टी.आगाराची विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर तसेच मंगळवेढा ऐगळी या राज्यमार्गावर चारपाच एकर  इतकी जागा आहे.या जागेवर सद्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एस.टी. च्या दक्षिण बाजूने व उत्तर बाजूने अतिक्रमणे झाल्याने एस.टी.आगाराची बांधकाम करणेबाबत अडचण निर्माण झाली आहे.नविन बी.ओ.टी.तत्वावर बांधण्यात येणारे जत बसस्थानकासाठी आ.सांवत यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा, श्री.कुंभार यांनी व्यक्त केली आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.