आसंगी तुर्क जळीतग्रस्त कुटूंबियांना मानव मित्र संघटनेकडून मदत


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील आसंगी तुर्क येथील भौरवा ईश्वर पुजारी यांच्या झोपडीवजा घराला आग लागून गॅसचा स्फोट होवून मोठे नुकसान झाले. जळीतग्रस्त कुटूंबियांना श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने तातडीने मदत जिवनावश्यक वस्तूचे किट व रोख पाच हजार रुपयाची मदत‌ करण्यात आली.श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत करण्यात आली.

श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सदस्य दत्ता सावळे, मिरासाहेब मुजावर, जाधव मिस्त्री, पाटील, मायाप्पा मोटे, सरदार मुजावर, मनगिरी डोंबळे, रावसाहेब डोंबाळे, श्रीमंत मोटे आदी उपस्थित होते.

आसंगी तुर्क जळीतग्रस्त कुटूंबियांना मानव मित्र संघटनेकडून तातडीने मदत देण्यात आली.