Header Ads

देशव्यापी संपामध्ये ग्रामसेवकांनी लावल्या काळ्या फिती

जत,प्रतिनिधी : सरकारी कर्मचारी व कामगार विरोधी असलेल्या केद्र सरकारच्या धोरणास कंटाळून पुकारलेल्या देश व राज्यव्यापी  एकदिवशीय संपास महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे राज्य अध्यक्ष विजय म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी संपास पाठिंबा देत काळ्या फिती लाऊन दैनंदिन कामकाज केले.






यावेळी जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड,  उपाध्यक्ष आप्पासाहेब माळी,जत तालुका अध्यक्ष संजय भाते,उपाध्यक्ष सुभाष कोळी सचिव दत्ता साळे,दादासो चव्हाण,अरुण शिंदे, विनायक माळी,घेरडे यल्लाप्पा चिकदुळे,सुरेश वाघमारे,माने,चव्हाण,खांडेकर आण्णासाहेब  याचेसह तालुक्यातील ग्रामसेवक बांधवानी सहभाग घेतला.



Blogger द्वारे प्रायोजित.