Header Ads

बेवनूरमध्ये वाळू तस्करी करताना जेसीबी,ट्रँक्टर पकडला
जत,प्रतिनिधी : बेवनूर ता.जत येथे काळेल मळा ओढापात्रात वाळू तस्करी करणाऱ्या वाहनावर महसूलच्या पथकाने छापा टाकला.त्यात वाळू भरण्याच्या तयारीत असलेला जेसीबी,व एक ट्रँक्टर ताब्यात घेतला आहे.

बेवनूर ओढापात्रात जेसीबी,ट्रँक्टरद्वारे वाळू तस्करी सुरू असल्याची‌ माहिती तलाठी दुष्यंत पाटील,वाल कोळी यांना मिळाली होती.त्याआधारे ओढापात्रात छापा टाकला असता वाळू भरण्याच्या तयारीत असलेला बेवनूर येथील संभाजी मधुकर हाक्के यांच्या मालकीचा जेसीबी,व राजाराम महादेव सरगर ट्रँक्टर आढळून आला.


तलाठी पाटील,कोळी यांनी जतचे तहसीलदार सचिन पाटील यांना माहिती दिली.त्यांनी नायब तहसीलदार माळी व कर्मचाऱ्याचे पथक घटनास्थळी पाठविले.त्यांनी रितसर पंचनामा करून दोन्ही वाहने ताब्यात घेत जत तहसील कार्यालय येथे आणून लावली आहेत.त्यावर दंडाची रक्कम प्रस्तावित करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती नायब तहसीलदार माळी यांनी दिली.


बेवनूरमध्ये वाळू तस्करी करताना पकडलेला जेसीबी व ट्रँक्टर 
Blogger द्वारे प्रायोजित.