Header Ads

वन विभागाच्या आर्शिवादाने वृक्षतोड वाढली | निसर्गाचा समतोल बिघडला

जत,प्रतिनिधी: एकेकाळी जत तालूक्यातील दाट झाडीने व्यापलेल्या आणि प्राणी संपदा असलेल्या विविध प्रकारच्या वृक्षांनी बहरलेली राने वने, शेतातील वृक्षसंपदा, जंगले उजाड झालेली आहेत.वेळीच संबधित विभागाकडून उपाययोजना न झाल्यास वृक्ष तोडीने उजाड व बोडका झालेला परिसर पहावा लागेल अशी सध्याची परिस्थिती आहे. 





शेतकर्‍यांच्या शेतातही मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारची मौल्यवान जातीची झाडे होती.मात्र सतत होणार्‍या दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आणि कुटुंबाचा निर्वाह चालवण्यासाठी लाकूड कंत्राटदारांना शेतात असलेली झाडे विकू लागला. स्वत:च्या आर्थिक दारिद्रय़ाची झळ कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात झाडे कापून विकली. आतातर सर्रास शेतातील झाडे लाकूड कंत्राटदारांना विकून ती कापली जात आहेत. त्यामुळे एकेकाळी हिरवीगार दिसणारी शेती आज वृक्षांविना उजाड होताना तालूक्यात चित्र आहे. 





अन्न, निवारा व वस्त्रांसोबत मानवासह प्राणीमात्रांना जगण्यासाठी शुध्द वातावरणाची गरज आहे. शुध्द वातावरण निर्मिती वृक्षांमुळेच होते. शुध्द वातावरण निर्माण करून देणार्‍या मूळ स्त्रोतावरच मानवाने घाला घातल्याने त्याचा परिणाम मानवासह पशुपक्ष्यांवरही झाला आहे. उरलेसुरले शेतातील वृक्ष स्वार्थासाठी नष्ट केले जात असताना संबधित वन विभागाकडून  कोणतीच ठोस उपाययोजना केली जात नाही. त्याच्यात व वृक्षतोड कंत्राटदारात मोठा आर्थिक देवघेवीने वृक्षतोड दिवस न दिवस वाढतच आहे.





काही शेतात अल्पशा प्रमाणात वृक्ष उरले आहेत. त्यांनाही वाचविण्याचे प्रयत्न होत नाहीत. वृक्षतोडीने  होणाऱ्या निसर्गाच्या ऱ्हासाबाबत शेतकऱ्यात जागृत्ती
संबधित विभागाकडून होणे आता कळीचे बनले आहे.





अन्यथा वृक्षाविना उजाड व बोडका झालेला परिसर बघण्याचे नशिबी येऊ शकेल. त्यावेळी पाऊसचेही प्रमाण कमी होईल व निसर्गावर प्रंचड परिणाम होऊन पुर्णत: समतोल बिघडल्याचे पहावे लागेल त्यावर शासनाच्या उपाय योजना

Blogger द्वारे प्रायोजित.