Header Ads

शिष्यवृत्ती परिक्षेत हफ्सा तांबोळी गुणवत्ता यादीत
 

 

डफळापूर,वार्ताहर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता-पाचवी व आठवी शिष्यवृत्तीची गुणवत्ता यादी गुरुवारी  दिनांक 12 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आली.त्यात‌ डफळापूर येथील जि.प.मुलींची शाळा नं 2 शाळेतील विद्यार्थिनींने सलग पाचव्या वर्षी उज्वल यश संपादन केले.उत्तम नियोजन व त्याप्रमाणे कार्यवाही यामुळेच शाळेचा निकाल 64.28 टक्के लागला आहे.

 

 

 

शाळेतील जिल्हा गुणवत्ता धारक हफ्सा नौशाद तांबोळी (232) ही जिल्हा गुणवत्ता यादीत 149 वा क्रमांक तर तालुक्यात 6 वा क्रमांकने यशस्वी झाली आहे. केंद्राचे केंद्र प्रमुख रतन जगताप व शंकर बेले, मुख्याध्यापिका रेखा कोरे, एस.एम.सी.अध्यक्ष गोटू शिंदे,उपाध्यक्ष हणमंत कोळी व सर्व एस.एम.सी सदस्य यांनी कौतूक केले.उदयोगरत्न संकपाळ, अलका पवार,शंकर कुंभार, सुषमा चव्हाण,अजय डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

 
Blogger द्वारे प्रायोजित.