Header Ads

उमराणीत घाणीचे साम्राज्य,डांस वाढले

 


 

उमराणी,वार्ताहर : उमराणी ता.जत येथे सांडपाणी गटारीतील सांडपाणी लोकवस्तीक साठून राहून दुर्गंधी,डांसाचे उत्पत्ती वाढत असून डेंग्यू,चिंकनगुण्या सारख्या साथीचा धोका निर्माण झाला आहे.सांडपाणी वाहून जात नसल्याने गावात दुर्गंधी पसरली आहे.सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साठलेले असतानाही ग्रामपंचायतीचे मुर्दाड पदाधिकारी व प्रशासन हाताची घडी तोंडावर बोट या दशेत आहे.

 

 

 

गावात घाणीचे साम्राज्य आहे.त्यावर कहर म्हणजे कचऱ्यांचे ढिगारे व गटारीचे पाणी थेट ग्रामपंचायत कार्यालय,सार्वजनिक ठिकाणी जमा झाले आहेत.गावाच्या स्वच्छता व आरोग्याची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय परिसरासह सार्वजनिक परिसरातील स्वच्छता करावी,वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे,अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.

 

 


 घाणीघाण व दुर्गंधीमुळे धोका

 

सध्या तालुकाभर कोरोनाचा धोका कायम असताना उमराणी ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार पणामुळे गावात दुर्गंधी,कचरा,सांडपाण्यामुळे डांसाच्या उत्पत्ती वाढली असून,डांसाचे थैमान माजले आहे.डांसाची संख्या वाढल्याने कोरोना बरोबर डेंगू,मलेरिया,चिकनगुण्या साथीचा धोका मानगुठीवर बसला आहे.सार्वजनिक ठिकाणी दिवसाही डांस फोडून काढून आहेत.

 

 


उमराणी ता.जत येथे सार्वजनिक ठिकाणी असे कचऱ्यांचे ढिगारे जमा झाले आहेत.

Blogger द्वारे प्रायोजित.