Header Ads

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या ; महेश खराडे यांची मागणी

 


सांगली : सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीप हंगाम वाया गेला,अजूनही आणखी पावसाची शक्यता आहे, त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करावेत,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाखाची मदत करावी अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे सरकारने दखल न घेतल्यास आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

 

 

खराडे म्हणाले, कोरोना संकटामुळे शेती आणि शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे कोरों नाच्या काळात सर्व व्यवसाय आणि उद्योग बंद असताना शेतकरी रानात राबत होता त्याने विक्रमी उत्पादन घेवून देशाला जगविण्या चे काम केले मात्र शेतकऱ्याच्या पदरात काय पडले भाज्या, फळे, धान्य कवडीमोल किंमतीने विकावे लागले त्यामुळे देशाला जगवून्ही शेतकरी त्याची पोरं बाळं उपाशीच राहिली पण देशासाठी त्याने सर्व सहन केले.

 

 

खरीप हंगाम चांगला जाईल अशी शक्यता निर्माण झाली होती पहिल्या टप्प्यात पाऊसही चांगला पडला सोयाबीन,भात,ज्वारी,मका,उडीद,मुग मटकी,ऊस आदी पिके जोमात आली द्राक्ष आणि डाळींब चे उत्पादनही जोरदार येण्याची शक्यता निर्माण झाली मात्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात विशेषतः दुष्काळी जत,आटपाडी,खानापूर,तासगाव, कवठेमहांकाळ,कडेगाव या तालुक्यात तुफान अतिवृष्टी झाली आहे.या शिवाय शिराळा वाळवा मिरज व पलूस या तालुक्यात ही पावसाने थैमान घातले या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन मका ज्वारी भात आदीसह सर्व कडधान्ये वाया गेले ही सर्व पिके आता पाण्याखाली आहेत त्याची काढणी करणेही शक्य नाही,म्हणजेच शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.

 

 

याशिवाय द्राक्ष बागांची ऑक्टोबर छाटणी ही अद्याप घेणे शक्य झालेले नाही.अती पावसामुळे द्राक्ष काड्या पक्व होणे अपेक्षित असते.मात्र ढगाळ वातावरण मुळे फळ धारणेसाठी आवश्यक पक्वता 

काड्यामध्ये तयार झाली नाही,त्यामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला आहे.तीच अवस्था डाळींब उत्पादक शेतकऱ्याची झाली आहे डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी बहर घेतला आहे. पण अती पावसाने फळ कुज सुरू झाली आहे.त्याच बरोबर कोबी,धाबू फ्लॉवर टोमॅटो सह सर्वच भाजीपाला उत्पादक शेतकरी अती पावसामुळे अडचणीत सापडला आहे.त्यामुळे सर्वच शेतीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देवून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाखाची मदत जाहीर करावी,त्याच बरोबर ओला दुष्काळ जाहीर करून रब्बी हंगामासाठी बी बियाणे खते याचा मोफत पुरवठा करावा या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा खराडे यांनी दिला आहे

Blogger द्वारे प्रायोजित.