Header Ads

करजगीतील वाहून गेलेल्या युवकाचा सांगलीतील जीवरक्षक टीमकडून शोध सुरू

 



 


करजगी,वार्ताहर : करजगी ता.जत येथील बोर नदीत वाहून गेलेल्या युवकांचा अद्याप शोध लागलेला नाही.आज सकाळपासून सांगलीच्या जीवरक्षक टिमकडून या युवकाचा शोध घेण्यात येत आहे.


 


 


 


गुरूवारी सकाळी बोर नदीला आलेल्या बोर नदी पात्रावरील करजगी-भिवर्गी पुलावरून दुधाची वाहतूक करणारा ट्रँक्टर नदी पात्रात पलटी झाल्याने पिंटू भिमू धायगोडे रा.सनमडी हा वाहून गेला आहे.


 


 



गुरूवारी सकाळपासून उमदी पोलीस,स्थानिक नागरिकांनी युवकांचा शोध घेतला मात्र अद्याप त्याला शोधण्यात अपयश आलेले आहे.पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने मोठ्या अडचणी येत आहेत. शुक्रवार सकाळी सांगलीच्या जीवरक्षक टिमला प्राचारण करण्यात आले आहे. टीमच्या सदस्याकडून शोध मोहिम चालू करण्यात आला आहे. आजही पाण्याचा मोठा प्रवाह नदीत सुरू आहे.


 


 


 


 



 


Blogger द्वारे प्रायोजित.