Header Ads

माडग्याळमध्ये 'माझे कुंटुब,माझी जबाबदारी' मोहिमेस सुरूवात
 

माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ,ता.जत माझे कुंटुब,माझी जबाबदारी मोहिमेस सुरूवात करण्यात आली.15 ते 24 ऑक्टोंबर पर्यत ही मोहिम राबविण्यात येणार आहे.कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने विविध आजार,कोरोना सदृश लक्षणाची नागरिक शोधण्यासाठी पुढील दहा दिवस घर टू घर सर्व्हे करण्यात येणार आहे.

 

कोरोना वाढता संसर्गाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात ही मोहिम सुरू झाली असून माडग्याळ येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.या मोहिमेत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत.कोरोनाचा यशस्वीपणे प्रतिकार करण्यासाठी लोक सहभाग हा अतिशय महत्वाचा असुन आपल्याला यापुढे अतिशय सतर्कतेने रहाणे गरजेचे असुन यासाठी लोक सहभाग अतिशय महत्वाचा असल्याने सर्वांनी एकजुटीने आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने यावेळी करण्यात आले.


 

   

Blogger द्वारे प्रायोजित.