जाळीहाळ खुर्द बंधाऱ्यांतील पाण्याचे पुजन
 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ओढापात्रातील बांधलेले बंधारे पाणी साठविण्यासह जमिनीतील पातळी वाढविण्यासाठी फायदेशीर ठरले आहेत,असे प्रतिपादन माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले.

 

 

 

तालुक्यातील जालिहाळ खुर्द येथे बोर नदी वर केटीव्हेअर बंधाऱ्यांतील पाणी पूजन व गावात विठ्ठल मंदिर परिसरात वृक्षारोपण माजी आमदार जगताप यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप जत तालुका अध्यक्ष सुनील पवार,जि.प.सदस्य सरदार पाटील,नगरसेवक उमेश सावंत आदी पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

 

 

 

जाळीहाळ खुर्द ता.जत येथील बंधाऱ्यातील पाण़्याचे पुजन करताना माजी आमदार विलासराव जगताप,सरदार पाटील,सुनिल पवार,उमेश सांवत