Header Ads

'माझे कुंटुब, माझी जबाबदारी' कोरोनाला पायबंध बसणार : डॉ. प्रदिप कोडग 

 

 


आवंढी,वार्ताहर : महाराष्ट्र शासनाने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात माझे कुटुंब,माझी जबाबदारी हे अभियान कोरोनाचा प्रभाव रोकण्यात प्रभावी ठरणार आहे.कोरोनाचा फैलावाला यामुळे पायबंध बसणार आहे,असे प्रतिपादन माजी उपसंरपच प्रदिप कोडग यांनी केले.

 

आंवढी ता.जत येथे या अभियानाचा प्रांरभ करण्यात आला.त्यावेळी कोडग बोलत होते.डॉ.कोडग म्हणाले कि,लाँकडाऊन, जमावबंदी,जनता कर्प्यू नंतरही कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहेत,मुत्युदरही वाढला आहे. त्यापार्श्वभूमीवर शासनाने कोरोनाला समुळ नष्ट करण्यासाठी नवा उपक्रम माझे कुंटुब माझी जबाबदारी राबविला आहे.या मोहिमेअंतर्गत गावातील सर्वच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करुन आरोग्य इतिहास जाणुन घेण्यात येणार आहे. त्याशिवाय तापमान,ऑक्सीजन पातळी तपासून त्या व्यक्तीवर औषधउपचार,सल्ला देण्यात येणार आहे.

 

आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका,आरोग्य सेविकांचे पथके स्थापन करून घरोघरी सर्व्हे करण्यात येत आहे.यावेळी सरपंच आण्णासाहेब कोडग,उपसरपंच आण्णासाहेब बाबर, ग्रामसेवक शिंदे,ग्रा.पं.सदस्य रत्नमाला कोडग,पार्वती कोडग,मुगाबाई कोडग,मनिषा कुंभार, सुभाष कोडग,आशा वर्कर, आंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

आंवढी ता.जत येथे माझे कुंटुब माझी जबाबदारी मोहिमेचा प्रांरभ करण्यात आला.

Blogger द्वारे प्रायोजित.