Header Ads

शिराळ्यात 6 हजार लिटर क्षमतेचा युनिटची लवकरच उभारणी






















 





शिराळा : येथील उपजिल्हा रुग्णालयात 6 हजार लिटर क्षमतेच्या ऑक्सिजन युनिटची उभारणी सुरू झाली असून येत्या आठ दिवसात हे युनिट कार्यान्वीत होईल,अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.चार व्हेटींलेटर, दोन ड्यूरा ऑक्सिजन सिलींडर,रेमडिसिविर सारखी महागडी इंजेक्शनही उपलब्ध झाली आहेत,असे ते म्हणाले.

 

 

आज आमदार नाईक यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देवून येथील सोई, सुविधांची पहाणी केली.सोबत तहसीलदार गणेश शिंदे होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले,रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्याबाबत दोन दिवसापूर्वी बैठक झाली.या बैठकीत कठोर शब्दात कांही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अंमलबजावणी होत आहे का, हे पाहण्यासाठी आज उप जिल्हा रुग्णालयास भेट दिली.सध्या येथे 75 बेड उपलब्ध असून त्यांना ऑक्सीजनची जोडणी आहे. याशिवाय चार व्हेंटीलेटर संच उपलब्ध झाले आसून ते बसवणे व त्यास आवश्यक डॉक्टर व परिचारीका उपलब्ध झाल्या आहेत. 

 

 

आमदार नाईक म्हणाले, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेमडिसिविर, लो मोलेक्युलार वेट हेपरिन, हायड्रोक्लोसोन, डेक्सोमिट्यासोन, अँटिबायोटिक ही इंजेक्शन उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे ऑक्सिजन तुटवडा यापुढे भासणार नाही. आता कोरोना रुग्णांवरील उपचारात कोणत्याही प्रकारची कमतरता राहीली नाही. नवीन ऑक्सीजन युनिटीची उभारणी पूर्ण झाल्यानंतर येथे ऑक्सीजनची कमतरताच भासणार नाही. शिवाय बेड ही वाढवता येतील. आरोग्य विभागाने रुग्णांची योग्य काळजी घेत व वेळेत उपचार करावेत. रुग्णांच्या नातेवाईकांना आधार द्यावा. इतर रुग्णांवर स्वतंत्र उपचार यंत्रणा ठेवावी. कोरोना संयशीत रुग्णांच्यासाठी स्वतंत्र दहा खाटांचा कक्ष सुरू करावा, आदी नियोजन करण्याच्या सूचना केल्या. या वेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील, उप अभियंता अतुल केकरे, डॉ. नितीन जाधव, डॉ.अनिरुद्ध काकडे, शाखा अभियंता पी. वाय. कदम, डॉ. मनोज महिंद आदी उपस्थित होते.

 

 

 शिराळा उप जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येत असलेल्या सहा हजार लिटर क्षमतंच्या ऑक्सीजन युनिटची उभारणी कामाची पाहाणी करताना आमदार मानसिंगरास नाईक, सोबत अधिकारी

 









 




 

 

 

 



 





 

 

 





Blogger द्वारे प्रायोजित.