Header Ads

शेगावला कोरोनाचा वेढा,प्रशासन गंभीर होणार कधी | एकाच दिवशी 12 रुग्ण : आतातरी जागे व्हा ; दिगंबर निकम

 


 

शेगाव,वार्ताहर : सुमारे 15 हजारावर लोकसंख्या असलेल्या शेगावमध्ये कोरोनाचा रुग्ण 22 वर पोहचले आहेत,त्यात शनिवारी एकाच दिवशी 12 नवे रुग्ण वाढले आहेत.गावात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असूनही प्रशासक असलेल्या अधिकाऱ्यांना गांर्भिर्य नाही,असा आरोप भाजपचे युवा नेते दिगंबर निकम यांनी केला आहे.

 

जत पासून पंधरा किलोमीटर वर असलेल्या शेगाव हे आसपासच्या छोट्या,मोठ्या सुमारे पंधरा गावाची प्रमुख बाजार पेठ आहे.मोठी लोकसंख्या असणाऱ्या शेगावाचा सध्या कार्यभार प्रशासकावर आहे.कोरोनाचे आतापर्यत 22 रुग्ण आढळून आहेत.इतके असतानाही गावात गटारी तुंबल्या आहेत,सगळीकडे घाणीचे साम्राज्य आहे. आतापर्यत एकदाही कोरोना प्रतिबंधित औषधे फवारण्यात आलेले नाहीत.नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन, ग्रामसेवक गंभीर नाहीत.त्याशिवाय बाहेरून गावात येणाऱ्या व गावातील लोक सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर करत नाहीत.

 

परिसरातील बनाळी,वायफळ,अंतराळ,आंवढी,लोहगाव,नवाळवाडी,बागलवाडी,वाळेखिंडी, बेवनूर,गुळवंची,कासिंलिंगवाडी येथील नागरिक विविध खरेदी,शासकीय कामासाठी शेगावमध्ये येत आहेत. त्यामुळे शेगाव करांना धोका कायम आहे.

शनिवारी सर्वाधिक 12 कोरोना बाधित आढळून आल्याने धोका वाढला आहे.आतातरी प्रशासनाने औषध फवारणी, स्वच्छता, व शासन नियमाचा अंमल करावा,अन्यथा प्रशासका विरोधात वरिष्ठ कार्यालसाकडे तक्रार करावी लागेल,असा इशाराही निकम यांनी दिला आहे.

 

 

औषध फवारणीसाठी साध्या पंपाची खरेदी

 

गावात एकदम नवे 12 कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर एक औषध फवारणीचा पंप घेण्यात आला आहे. त्याद्वारे गावभाग,सुमारे 25 वाड्यावस्त्यावर औषध फवारणीवर होणार हे हास्यास्पद आहे,असेही निकम म्हणाले

Blogger द्वारे प्रायोजित.