Header Ads

पावसाने उडवली रस्त्याची दैना | जत तालुक्यातील सर्वच रस्त्यावर खड्ड्याची मालिका

 


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील रस्ते कामा दर्जा अनेकवेळा समोर आला आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसात तालुक्यात पडलेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील काही महिन्यापुर्वी केलेल्या रस्त्यासह सर्वच रस्त्यावर खड्ड्याची मालिका तयार झाली आहे.भष्ट्र, कमिशनखोर अधिकाऱ्यांचा निकृष्ठ रस्ते कामाचा प्रताप तालुकाभर चर्चेचा विषय बनला आहे.

 
या खड्डेमय रस्त्यावरून जाणारा प्रत्येक वाहनधारक जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ठेकेदाराच्या नावाने लाखोली वाहत आहे.तालुक्यात दरवर्षी शेकडो कोटी खर्चून रस्त्याची कामे करण्यात येत आहेत.मात्र आतापर्यत एकही असा रस्ता उरला नाही,कि त्यावर्ती खड्डा पडला नाही.गेल्या पंधरा दिवसातील पावसाने या दर्जाहिन रस्ते कामाचा आरसा समोर आणला आहे.

 


उंटावरून शेळ्या राखणारे अधिकारी,मनमानेल तसे काम करणारे ठेकेदार यामुळे तालुक्यातील शेकडो कोटीच्या निधीवर डल्ला मारण्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यात महिन्यापुर्वी केलेल्या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत.पावसाने या रस्त्याचा घेर वाढविला आहे.त्यात दुचाकी,चारचाकीचे आपघात नित्याचे झाले आहेत.कोणता खड्डा वाचवायाचा असा प्रश्न वाहन धारकासमोर पडत आहेत.तालुक्यातील खड्डेमय,नागरिकांच्या कमरेला दणके देणाऱ्या रस्ते कामाबाबत समाज सुधारणेचा आव आणणारे विविध पक्षाचे नेते,पदाधिकारी, समाजसुधारकांची चुप्पी बरचं काय सांगून जात आहे.

 


Blogger द्वारे प्रायोजित.