Header Ads

पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुपालकांनी खबरदारी घ्यावी |जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे

 


पशुपालन' का अर्थव्यवस्था में महत्वपूर्ण योगदान - animal husbandry  contributes significantly to the economy


 सांगली  : महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमधील पशुधनामध्ये लम्पी स्कीन डिसीजचा (एल.एस.डी.) प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे.  हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुपालकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे यांनी केले आहे.


लम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रादुर्भाव झालेले पशुधन आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून त्यांची माहिती द्यावी. तसेच आजारी पशुधन अन्य निरोगी जनावरापासून वगेळे बांधावे. गोठा व परिसर स्वच्छ आणी हवेशीर ठेवावा. परिसरात पाणी साठणार नाही याच दक्षता घ्यावी. तसेच बाधित जागेचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी Sodium Hypochlorite 2-3 टक्के, Phenol 2 टक्के 15 मिनीटासाठी वापरावे. आदि औषधांचा वापर करावा. कीटकनाशक औषधांचा फवारा पशुधनाच्या अंगावर करावा व गोठ्यात फवारणी करावी. प्रादुर्भावग्रस्त भागात जनावरांची ने-आण करणे किंवा खरेद-विक्री करणे या गोष्टी टाळाव्यात. यावर बंदी आणणे व जनावरांची वाहतूक व जनावरांचे बाजार (बाधित गावापासून किमान 10 किलोमीटर पर्यंतचे) बंद ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. आदि उपाययोजना करणे आवश्यक आहे.


हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यावर विशेष उपचार नाही. परंतु जखमांमध्ये जिवाणूचा संसर्ग होवून इतर आजार वाढू नये म्हणून प्रतिजैविके व इतर औषधे पशुवैद्यकांच्या सल्ल्याने घ्यावी लागतात. पाच ते सात दिवसांच्या नियमित योग्य उपचाराने हा पूर्णपणे बरा होतो. हा रोग प्रामुख्याने गाई, बैल, वासरांना होणारा विषाणूजन्य आजार आहे. कॅप्रीपोक्स या प्रवर्गातील विषाणूमुळे हा रोग होतो. देशी जनावरांपेक्षा संकरीत जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. या रोगाचा प्रसार कीटक, डास, चावणाऱ्या माशा, गोचिड आदींमार्फत होतो. या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील स्पर्शाने होतो. उष्ण व आर्द्र हवामानात या रोगाचा जास्त प्रसार होतो. या रोगाची बाधा गाय व म्हैसवर्गातील सर्व वयोगटाच्या जनावरांना होते. लहान वासरांमध्ये रोगाची तीव्रता अधिक दिसून येते. या रोगाचा प्रसार साधारण 10 ते 20 टक्के जनावरांमध्ये होतो. आजारामुळे जनावरे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावरे अशक्त होतात. त्याचे दुध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते. काही वेळा गर्भपात होऊन प्रजनन क्षमता घटते. या रोगात जनावराची त्वचा खराब  झाल्याने जनावर विकृत दिसते.


या आजारामध्ये जनावरांना ताप येणे, डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव होणे, भूक मंदावणे आदि सुरूवातीची लक्षणे दिसतात. नंतर जनावराच्या अंगावर विशेष करून डोके, मान, मायांग, कास, पोटाकडील भाग आदि ठिकाणी 2 ते 5 सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात. त्यातून पू येवू शकतो. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होवू शकतो. जनावरांचे दुध उत्पादन कमी होते, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे यांनी कळविले आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.