शहरातील गटारी,खड्ड्याची कामे करावीत


 

जत,प्रतिनिधी : गेल्या पंधरा दिवसात झालेल्या धुँवाधार पावसाने नगरपरिषदेचा कारभार समोर आला आहे.सातत्याने पावस पडत असल्याने शहरातील अनेक गटराची रस्ताची कामे हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. या विस्तारित भागाला नागरी सुविधा देण्यास प्रशासनाचा ना पाढा समोर येत आहे.

 

शहरात पावसामुळे नव्याने झालेले रस्ते उखडले आहेत. जून्या रस्त्यावर खड्ड्याची मालिका तयार झाली आहे.तर गेल्या पंधरा दिवसात रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे.त्याशिवाय शहरातील प्रत्येक रस्तावल मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.