Header Ads

उमराणीत स्वस्तधान्य दुकानातून किडका,जाळीयुक्त गव्हाचे वाटप
 

 


 

उमराणी,वार्ताहर : येथील स्वस्तधान्य दुकानातून कोरोना काळात गरीब नागरिकांना किडका,जाळीयुक्त गव्हाचे वाटप करण्यात येत असल्याने शिधाधारकातून नाराजी व्यक्त होत आहे.

 

कोरोनामुळे राज्यसह उमराणीतील नागरिक अडचणीत आले आहे.हाताला काम नाही,आर्थिक अडचणी यामुळे शासनाकडून  स्वस्तधान्य दुकानातून मिळणारा गहू मोठा आधार बनला आहे.या धान्यामुळे गरिब लोकांना दोन वेळच्या जेवनाची सोय झाली आहे.

 

मात्र उमराणी येथील स्वस्तधान्य दुकानातून देण्यात येत असलेला गहू जाळीयुक्त व किडका दिला जात असल्याचे आरोप होत आहेत.तहसीलदार सचिन पाटील यांनी यात लक्ष देऊन चांगल्या धान्याचे वाटप करावे,अशी मागणी होत आहे.


 

 
Blogger द्वारे प्रायोजित.