Header Ads

धनगर आरक्षणप्रश्नी जतेत 'ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन'

बिळूर,वार्ताहर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे  आरक्षण द्यावे,या मागणीसाठी व शासनाला जाग आणण्यासाठी तहसील कार्यालयासमोर "ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलन करण्यात आले.यावेळी ढोल वाजवत आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व युवक नेते लक्ष्मण जखगोंड यांनी केले.आरक्षण मागणीचे निवेदन नायब तहसीलदार माळी यांना देण्यात आले

यावेळी जखगोंड म्हणाले की, धनगर समाजाला घटनेत तरतूद असूनही गेली 70 वर्षे अनुसूचित जमातीच्या अनेक सवलतीपासून वंचीत ठेवले गेले.त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले.लिंगायत समाजाचा या आरक्षणाला पाठींबा असून धनगर आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र आहेत.तरी राज्य शासनाने त्वरित अध्यादेश काढून अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे.

यावेळी तेजस्विनी व्हनमाने,अविनाश तुराई, भाऊसाहेब दुधाळ,धनाजी पाटील, काशीनाथ पाटील,विनायक गोरे,अनिल पाटील,राजेंद्र खांडेकर,प्रवीण पुजारी आदी उपस्थित होते.

जत येथे धनगर आरक्षणप्रश्नी जतेत  'ढोल बजाओ सरकार  जगाओ आंदोलन' करण्यात आला.

बिळूर,वार्ताहर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे  आरक्षण द्यावे,या मागणीसाठी व शासनाला जाग आणण्यासाठी तहसील कार्यालयासमोर "ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलन करण्यात आले.यावेळी ढोल वाजवत आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व युवक नेते लक्ष्मण जखगोंड यांनी केले.आरक्षण मागणीचे निवेदन नायब तहसीलदार माळी यांना देण्यात आले.

यावेळी जखगोंड म्हणाले की, धनगर समाजाला घटनेत तरतूद असूनही गेली 70 वर्षे अनुसूचित जमातीच्या अनेक सवलतीपासून वंचीत ठेवले गेले.त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले.लिंगायत समाजाचा या आरक्षणाला पाठींबा असून धनगर आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र आहेत.तरी राज्य शासनाने त्वरित अध्यादेश काढून अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे.

यावेळी तेजस्विनी व्हनमाने,अविनाश तुराई, भाऊसाहेब दुधाळ,धनाजी पाटील, काशीनाथ पाटील,विनायक गोरे,अनिल पाटील,राजेंद्र खांडेकर,प्रवीण पुजारी आदी उपस्थित होते.

जत येथे धनगर आरक्षणप्रश्नी जतेत  'ढोल बजाओ सरकार  जगाओ आंदोलन' करण्यात आला.

Blogger द्वारे प्रायोजित.