Header Ads

गोपीचंद पडळकरांच्या दादागिरीला भीक घालणार नाही : विक्रम ढोणे | पत्रकार परिषद उधळण्याचा अयशस्वी प्रयत्न ; जतमध्ये होणार निर्णायक आंदोलन

 

 

सांगली: गोपीचंद पडळकर हे भाजपच्या व्होटबँक पॉलिटिक्ससाठी सातत्याने धनगर समाजाची दिशाभूल करत आहेत. यासंबंधाने समाजाला सत्य सांगण्याची भुमिका धनगर विवेक जागृती अभियानाने केली आहे. यामुळे पडळकरांचा घातकी चेहरा उघड होत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. म्हणूनच काल पंढरपूरमध्ये अभियानाची पत्रकार परिषद उधळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला, असे अभियानाचे संजोयक विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे. पडळकरांना आमच्या पत्रकार परिषदेची एवढी भीती कां वाटते? असा सवालही ढोणे यांनी केला आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर आरक्षण टिकवण्याच्या हेतूने अध्यादेश काढण्याची मागणी झाली.त्यानंतर प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर यांनी मराठा समाजाप्रमाणे धनगर आरक्षणाचा अध्यादेश (जीआर) राज्य शासनाने 

काढावा, अशी मागणी केली आहे. त्यावर 'हे नेते बंडलबाज आहेत, एसटी आरक्षणाचा जीआर काढण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नाही',अशी भुमिका विक्रम ढोणे यांनी घेतली आहे. पडळकर यांनी पंढरपूर येथे धनगर आरक्षणप्रश्नी आयोजित केलेले 'ढोल बजाओ' आंदोलन दिशाहीन असल्याचेही ढोणे म्हटले होते. त्यासंदर्भाने भुमिका मांडण्यासाठी काल पंढरपूर पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ढोणेंची पत्रकार परिषद आहे म्हटल्यावर ती होवू द्यायची नाही, उधळून लावायची या इराद्याने पडळकरांचे समर्थक असलेले 15-20 भाजप कार्यकर्ते पत्रकार संघात जमले होते. आम्ही ढोणेंना मारहणा करणार आणि पत्रकार परिषद उधळून लावणार असे ते पत्रकारांना म्हणत होते. त्या कार्यकर्त्यांमुळे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी तणाव होता. ही माहिती पोलिसांना समजताच तिथे पोलिस दाखल झाले. आम्ही पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहचण्यापुर्वीच त्यांनी दंगेखोरांना तिथून हुसकावून लावले होते. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात आमची पत्रकार परिषद पार पडली. हा एकूण प्रकार दहशतीचा आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नसल्याने पडळकरांची पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे ते मारामारीवर उतरले आहेत. पडळकरांनी काल गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते पत्रकार परिषद उधळण्यासाठी पाठवले, पण आम्ही त्यांना भीक घातली नाही. यापुढील काळात अगदी हल्ला जरी केलातरी आम्ही मागे हटणार नाही. आरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या धनगर समाजाच्या फसवणुकीबद्दल आवाज उठवत राहणार, असे ढोणे यांनी म्हटले आहे. 

 

Blogger द्वारे प्रायोजित.