Header Ads

अपुऱ्या यंत्रणा,तरीही जतचा कोरोनाशी लढा | मोठे आवाहने ; नॉन कोविड रुग्णावरही तात्काळ उपचार गरजेचे

Coronavirus India Report Covid 19 updates cases of 6 July Saturday 2020 -  Coronavirus Updates: राजस्थान में कोरोना वायरस संक्रमण से पांच और मौत, 524  नये मामले | India News in Hindi

 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाची एकीकडे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे या महामारीचा सामना करताना जत तालुक्यातील आरोग्य यंत्रणेपुढे मोठी आव्हाने उभी आहेत.

तालुक्यात आरोग्य सुविधा पुरविण्या इतपत कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही.अपुरा कर्मचारी वर्ग आणि साधने ही अशी कमकुवत बाजू असतानाही अनुभवी तालुका वैद्यकीय डॉ.संजय बंडगर कोरोनाला रोकण्यात कसोशीने प्रयत्न करत आहेत.उपलब्ध कर्मचारी व सुविधेवर त्यांनी तालुक्यातील वैद्यकीय सेवा सतर्क ठेवली आहे.तालुक्यातील आरोग्य सेवा पुरविण्याबरोबर त्यांच्यावर जत शहराचाही मोठा भार आहे.जत शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावला आहे.दररोज सरासरी चाळीच्या पट्टीत नवे रुग्ण वाढत आहेत.रँपिड टेस्टमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.अशा स्थितीतही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या धाडसाने कोरोना विरोधात प्रभावी लढा देत आहेत.यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना याचा काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. मात्र, तालुक्यातील अपुऱ्या यंत्रणेची दखल घेऊन वेळेत याचा पुरवठा करणे गरजेचे आहे.

जत ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. मात्र त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नाही. त्यातच अन्य कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे. यामुळे कोरोना आणि नॉन कोरोना रुग्णांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे.

जिल्हा परिषद अधिकारी आणि ग्रामीण रुग्णालय अधिकारी यांचा समन्वय नसल्यामुळे त्यांचा फटका नॉन कोरोना गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना बसत आहे.त्याना वेळेत उपचार न मिळाल्याने मुत्यूचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यासाठी एक समन्वयक अधिकारी नेमून त्यांच्यामार्फत ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र,कोविंड सेंटर,व अधिग्रहीत केलेली खाजगी रुग्णालये यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.रुग्णालयात आलेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे पाहण्यापेक्षा त्याच्यावर वेळेत व योग्य उपचार होणे गरजेचे आहे.वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मुत्यू होत आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे.कोरोना काळात जतमधील परिस्थिती नियत्रंणात आणण्यासाठी कागदवरील आकडेवारी पेक्षा प्रत्यक्ष गांऊडवर कारवाई करण्याची गरज आहे.

तालुक्यातील कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर,ग्रामीण रुग्णालय,खाजगी दोन हॉस्पिटल व आताही इंडियन मेडिकल असोसिएशनचे नवीन कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची वाढत्या संख्येवर उपचार मिळणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर जत शहरात नॉन कोविड रुग्णावर उपचार करणारी शासकीय सह खाजगी हॉस्पिटल सुरू राहणे गरजेचे आहे.

 

 

 

चांगल्या सेवेसाठी प्रयत्न : संजय बंडगर

 

जत तालुक्यात साधनसामग्री व अपुरा कर्मचारी आहे. बहुतांश जागा रिक्त आहेत.आरोग्य कर्मचारी प्रत्येक ठिकाणी पोहोचून नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण असून दररोज एक ते दोन कर्मचारी पॉझिटिव्ह येत आहेत.समाजकल्याण शासकीय वसतिगृहात नवीन कोरोना केअर सेंटर सुरू झाल्यानंतर आरोग्य

कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे,  माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.

 

 

जतच्या आरोग्य परिस्थितीवर प्रत्यक्ष कारवाईची गरज

 

 

जत तालुक्यात कोरोनाचा फैलाव होत आहे. त्याशिवाय अन्य आजारावरील उपचाराबाबत परिस्थिति गंभीर आहे.आरोग्य विभाग,प्रशासन कागदी घोडे नाचवत सर्व परिस्थिती नियत्रंणात असल्याचे दाखवय आहे.मात्र प्रत्यक्षात वेळेत उपचार मिळत नाहीत.म्हणून रुग्णाचे बळी जात आहेत.हि परिस्थिती बदलण्याची मागणी आम्हीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

 

प्रकाश जमदाडे

संचालक,केंद्रीय रेल्वे बोर्ड

Blogger द्वारे प्रायोजित.