Header Ads

उमराणीत सांडपाणी थेट रस्त्यावर

 


 

उमराणी,वार्ताहर : उमराणी ता.जत येथे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.महाराष्ट्र-कर्नाटकात सीमावर्ती असणाऱ्या दहा हाजार लोकसंख्येच्या उमराणीत गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारी नाहीत.त्यामुळे नागरिक सांडपाणी रस्त्यावर सोडत आहेत.

 

ते दिवसभर रस्त्यावरून वाहत असते.काही खोलकट ठिकाणी डबकी बनली आहेत.त्यामुळे दुर्गंधी डांसाची संख्या वाढली आहे.सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतीकडून दखल घेतली जात नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गंभीरपणे लक्ष देऊन गटारी बांधाव्यात,तात्पुरत्या सांडपाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

 

 

उमराणी ता.जत येथे थेट रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने धोका निर्माण झाला आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.