बालगावमध्ये आ.विक्रमसिंह सांवत यांचे जल्लोषात स्वागत
 


बालगांव,वार्ताहर : कर्नाटकातील तुबची- बबलेश्वर योजनेतूून पाणी भिवर्गी तलाव, करजगी,बोर्गी,बालगाव,हळ्ळी,सुसलाद  

पर्यत पोहचले आहे.या भागातील पाण्याचे पुजन या योजनेचे शिल्पकार आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले.आ.सांवत यांचे सर्व गावात फटाक्याच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.

 


एकप्रकारचे समाधान या भागातील नागरिकांच्या चेहऱ्यांवर ओंसाडून वाहत होता.सर्वत्र पाण्याचे स्वागत करण्यात येत आहे.यावेळी बाबासाहेब कोडग,संतोष पाटील,शावरसिद्द दुदगी,बाहुराय मोरे,इरण्णा सारवाड,अप्पासाहेब मुल्ला, वसंत लोणी,पालाक्षी लोणी,अणप्पा माळी,अप्पाशा सरसंबी,रामू कांबळे,सिवप्पा मेडीदार,राजु हविनाळ,अनिल कोटी,बंडु मुल्ला,नितीन दुदगी,लक्ष्मण ऐहोळ्ळी,पाटबंधारेचे अधिकारी श्री.मोरे,शेख आदी मान्यवर उपस्थित होते.