Header Ads

संखमध्ये 40 रुग्ण कोरोना मुक्त | डॉ.सुशांत बुरूकुले यांची माहिती ; 39 रुग्ण उपचाराखाली 

 

 


 

जत,प्रतिनिधी : संख परिसरात कोरोनाचा प्रभाव वाढला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या 17 गावामध्ये 79 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्या संखमधील 28 रुग्णाचा समावेश आहे,तर आतापर्यत 40 जण कोरोनामुक्त झाले आहेत,अशी माहिती डॉ.सुशांत बुरूकुले यांनी दिली.

 

 


 

बुरूकुले म्हणाले,आतापर्यत 301 अँन्टीजन टेस्टमध्ये 26,तर रँपिड टेस्टमध्ये 115 पैंकी 48 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.त्यातील साधारण लक्षणे आढळेले 23 जण होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. तर 40 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.6 जणावर पुढील उपचार घेण्यास पाठविण्यात आले आहे.कोरोनाचा अद्यापही संसर्ग कायम आहे, त्यामुळे नागरिकांनी मास्क,सोशल डिस्टसिंग, सँनिटायझरचा वापर करावा,स्व:तासह कुंटुबाची काळजी घ्यावी,असे आवाहनही डॉ.बुरकुले यांनी केले आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.