Header Ads

आमदार सांवत यांनी शब्द पाळला,जत-घाडगेवाडी रस्त्यासाठी निधी मंजूर

 


जत,प्रतिनिधी : जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिलेला शब्द पाळला आहे.त्यानी जत ते घाडगेवाडी रस्त्याचे खडीकरण,डांबरीकरण  कामासाठी नगरोत्थान योजनेतून वीस लाख रूपये मंजूर केले आहेत,अशी माहिती शिवनेरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यानी दिली. 

 

 

जत घाटगेवाडी या सात किलोमीटर अंतर रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे या मार्गावरून जाणारे येणारे घाटगेवाडी व परिसरातील नागरिक व वाहनचालक यांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यातच पावसाळ्यात या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्याने वाहन धारकांचे किरकोळ अपघात होत आहेत.

 

रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे निघून गेले आहे.दोन्ही बाजूला असलेल्या बाजूपट्टया पुर्णपणे खराब झाल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी केली होती.आमदार श्री. सावंत यांनी प्रत्यक्ष जत घाटगेवाडी या रस्त्याची जागेवर जाऊन पहाणी करत,दुरुस्तीचे आश्वासन दिले होते.शासनाकडून जत नगरपरिषदेसाठी नगरोत्थान योजनेंतर्गत दोन कोटी रूपये मंजूर केले आहेत.जत घाटगेवाडी या रस्त्याचे जत बिळूर रोड ते श्री.अंबाबाई पावतका रस्ता पर्यंत खडीकरण व डांबरीकरणची कामे मंजूर केली आहेत.

 

जत-घाडगेवाडी खड्डेमय रस्ता आता पक्का होणार आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.