अंकले | तील कोरोना बाधित रुग्णाचा अन्य एका मित्राचा रिपोर्ट निगेटिव्ह |

 
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील अंकले येथे सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या अन्य एका मित्राचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने अंकलेकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईहून अंकले येथे आलेला मजूर कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली होती.त्याच्यासोबत अन्य दोघे मुंबईहून आले होते.त्यामुळे एकदम जवळचा संपर्क आल्याने त्या दोघांनाही मिरज रुग्णालयात असोलेशन कक्षात ठेवले होते.त्यांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यातील एकजण मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने भितीचे वातावरण पसरले होते.दरम्यान आज बुधवारी अन्य एका मित्राचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.

दरम्यान,कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने अंकलेत कंटेनमेट झोन घोषित करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसापासून येथे गावकऱ्यांची दररोज तपासणी करण्यात येत आहे.अन्य कोन संपर्कात आले आहे काय यांचाही तपास सुरू आहे.गावात बाहेरून येणाऱ्यास मनाई करण्यात आली आहे.ग्रामपंचायतीकडून औषध फवारणी करून गाव निर्जतूकीकरण करण्यात आले आहे.