Header Ads

पुराचे पाणी देण्याचे निर्णय स्वागतार्ह : अँड.प्रभाकर जाधव : देवनाळ लिप्ट पोजेक्ट पुर्ण व्हावा





 

 

जत,प्रतिनिधी : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घोषणा केल्याप्रमाणे पुराचे पाणी यंदा दुष्काळी जत तालुक्यात फिरविण्या़चा निर्णय स्वागतार्ह आहे.या निर्णयामुळे अनेक वर्षापासून दुष्काळी असलेल्या जत तालुक्यातील मोठे क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती, अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.प्रभाकर जाधव यांनी संकेत टाइम्सशी बोलताना दिली.

गत वर्षात पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील सांगली,मिरजेसह कृष्णा नदीलगतच्या गावांना पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता.त़्यामुळे त्यातील सुमारे सहा टिएमसी पाणी दुष्काळी भागात सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.त्यामुळे जतकरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 




गेल्या दोन तपापासून जत तालुक्यातील योजनेत समाविष्ट अनेक गावे म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.गत सरकारच्या काळात तत्कालीन कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खा.संजयकाका पाटील यांनी योजनेचे काम करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत.सध्या योजनेचे काम पुर्णत्वाकडे आहे.कँनॉल,पंपहाऊस,बंधिस्त पाईपलाईन यामाध्यमातून जत तालुक्यातील अनेक गावातील तलाव,बंधारे,नालाबांध,ओढे,नाल्यामध्ये पाणी साठविणे शक्य आहे.

यंदा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घोषणा केल्याप्रमाणे पुऱाचे पाणी दुष्काळी भागात सोडून सर्व ओढे,नाले तलाव,बंधारे भरण़्यात येणार आहे.तसा आराखडाही जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात आला आहे. या पाण्यामुळे अनेक दिवसापासून पाणी येईल यासाठी आस लावून बसलेल्या शेतकरी सुखी होणार आहे.त्याशिवाय जत तालुक्यात हरितक्रांती आणण्याचे लोकनेते राजारामबापू पाटील यांचे स्वप्न त्यांच्या सुपुत्र जयंत पाटील यांच्या माध्यमातून पुर्णत्वाकडे जाणार आहे,असेही जाधव म्हणाले

 

 

देवनाळ लिप्ट पोजेक्ट पुर्ण व्हावा

 

जत तालुक्यातील उत्तर बाजूतील जवळपास पंचवीस गावाना पाणी देण्यासाठी असणाऱ्या खलाटी पंपहाऊस ते देवनाळ लिप्ट पोजेक्ट पुर्ण करावा.यामाध्यमातून कायम पिण्यासाठी हाल होणाऱ्या देवनाळ,उमराणी,मुंचडी,वळंसग,सोर्डीपर्यतच्या भागात नैसर्गिक उताराने पाणी सोडल्यास पाणी प्रश्न सुटणार आहे.त्याशिवाय बिळूर,वज्रवाड,एंकूडी,शिंगणापूर, कडणूर पर्यत बंधिस्त पाईपलाईनमुळे तेथेही पाणी पोहचणार आहे.

प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र असलेल्या गुड्डापूरचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचेही अँड.जाधव म्हणाले.




Blogger द्वारे प्रायोजित.