जतेत खरेदी-विक्री व्यवहार सुरू 


 


जत,प्रतिनिधी ; जत दुय्यम निबंधक कार्यालयात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन सांगली यांच्या आदेशानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करित त्यांच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे    तारेवरची कसरत करत आज (ता.15)पासून प्राॅपर्टी रजिष्ट्रेशनची दस्त नोंदणी सुरू करण्यात आली आहे.  कोरोनाचे पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सरकारी कार्यालयातील कामकाज कमी कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरू करण्यास परवानगी दिली होती.परंतु राज्यातील नोंदणी विभाग असा आहे की, या विभागांतर्गत प्राॅपर्टी रजिष्ट्रेशनची नोंदणी करते वेळी एका व्यवहारासाठी  कमीत कमी चार ते पाच व जास्तीत जास्त पंधरा ते वीस इतके पक्षकार हजर असतात.

सद्या जगभर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. आपल्या देशात ही या कोरोनारूपी संकटाने शिरकाव केला आहे. आपल्या राज्यात तर या कोरोनाचे बाधित रूग्ण तीस हजारचे जवळपास जाऊन पोहचले आहेत. 

असे असले तरी देशाची व राज्याची अर्थव्यवस्था  कोरोनारूपी महामारी च्या संकटात डबघाईला आली आहे. ही अर्थव्यवस्था सावरावयाची असेल तर राज्यातील नोंदणी विभाग सुरू केला पाहीजे.परंतु हा विभाग सुरू करण्यासाठी प्रशासनापुढे अनेक अडचणी उभ्या आहेत.विशेष म्हणजे प्राॅपर्टी रजिष्ट्रेशनची अंमलबजावणी पार पाडत असताना कोरोनाचे पार्श्वभूमी वर दुय्यम निबंधक कार्यालयात सॅनिटाईझरची यंत्रणा उभी करणे. दुय्यम निबंधक व पक्षकार यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवणे. कार्यालयीन कर्मचारी तसेच पक्षकार यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवणे. आठवड्यातून एकदा संपूर्ण दुय्यम निबंधक कार्यालय सॅनिटाईझर करून घेणे. कार्यालयीन कर्मचारी यानी तसेच या कार्यालयांतर्गत असणारे मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यानी चांगल्या प्रकारे तोंडावर मास्क लावणे बंधनकारक केले आहे. तसेच प्राॅपर्टी रजिष्ट्रेशनसाठी येणारे सर्व पक्षकारांना ही सोशल डिस्टन्सिंग व तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे आजपर्यंत दुय्यम निबंधक कार्यालयात कोरोना कालावधीत जमीन खरेदी विक्री व्यवहार करण्यात येत नव्हते. 

 
शुक्रवार पासून जतचे दुय्यम निबंधक श्री. सुनिल पाथरूट यांनी मार्गदर्शक सुचनांप्रमाणे जमीन खरेदी विक्री व्यवहाराची दस्त नोंदणीचे कामकाज सुरू केले असलेतरी हे करित असताना जत दुय्यम निबंधक कार्यालयातील जागा सोशल डिस्टन्सिंगच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे गैरसोयीची होत आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी जमीन खरेदी विक्री चे व्यवहार नोंदविताना कितीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे ठरवले तरी कार्यालय छोटे असल्याने सोशल डिस्टन्सिंग चे बाबतीत अनेक अडचणींना कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांना तोंड द्यावे लागत आहे. तरीही जत दुय्यम निबंधक कार्यालयात प्राॅपर्टी रजिष्ट्रेशनचे कामकाज सुरूच राहणार आहे.

     तसेच दुय्यम निबंधक कार्यालयांतर्गत असलेले मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक यांच्या कडूनही सोशल डिस्टन्सिंग चे पालन करित मुद्रांक विक्री सुरू करण्यात आली असून ज्यांना मुद्रांक खरेदी करावयाचे आहेत. त्यानी मुद्रांक खरेदीला येते वेळी स्वताचे पेन, पक्षकार जर अंगठेवाला असेल तर त्याने स्व:ताचे अंगठ्याचे पॅड आणणे बंधनकारक आहे. तसेच तोंडाला चांगल्या प्रकारचे मास्क लावणे व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करणे मुद्रांक खरेदी करतेवेळी बंधनकारक असणार आहे,असे आवाहन मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटना अध्यक्ष बी.डी.बंडगर यांनी केले आहे.