Header Ads

आंवढी | तुकाराम बाबाकडून भाजीपाला वाटप


 

आवंढी,वार्ताहर :  आवंढी ता.जत येथील 200 गरजू कुटुंबांना मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांचेकडून भाजीपाला किटचे वाटप केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांना व मजुरांना हाताला काम नाही,सध्या लोकांची आर्थिक परिस्थिती फार नाजूक आहे.या काळात लोकांना मदतीची गरज आहे.भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी आज माणुसकीचा धर्म जपत आवंढी गावातील,गोरगरीब,अपंग,विधवा अश्या 200 कुटुंबाला भाजीपाला किटचे वाटप केले.यावेळी सरपंच आणासाहेब कोडग,उपसरपंच आणासाहेब बाबर,प्रगतशील शेतकरी संभाजी कोडग ग्रा.प.सदस्यांनी तुकाराम बाबा महाराज यांचे गावाच्या वतीने आभार मानले.

 

आंवढी ता.जत येथे भाजीपाला वाटप करताना तुकाराम बाबा
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.