Header Ads

कोरोना | जत नगरपरिषद कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी


जत,प्रतिनिधी : 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कोरोनाच्या लढाईत कोरोना वारियर्स म्हणून काम करत असलेल्या जत नगरपरिषदेच्या कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

कोरोना विषाणुचा फैलाव होऊ नये म्हणून हे कर्मचारी स्व:ताच्या जीवाची पर्वा न करता शहरात काम करत आहेत.या कोरोना वारियर्सची आरोग्य तपासणी,तापमान,स्क्रीनिंग टेस्ट करण्यात आली.महाराष्ट्र दिनानिमित्त जत शहरातील डॉक्टर रोहन मोदी,डॉक्टर,विवेकानंद राऊत व डॉक्टर सचिन वाघ हा उपक्रम राबविला.यावेळी मुख्याधिकारी अभिजीत हराळे,नगराध्यक्षा सौ.शुभांगी 

बन्नेनवर व पदाधिकारी उपस्थित होते.

Blogger द्वारे प्रायोजित.