Header Ads

आंवढी | वादग्रस्त स्वस्तधान्य दुकानाचा परवाना अखेर रद्द | जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई ; तांदुळ प्रकरण भोवले

 

आंवढी ; जत तालुक्यातील आंवढी येथील तांदुळ हडप प्रकरणातील एस.व्ही.पाटील या

स्वस्तधान्य दुकानाचा परवाना अखेर जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी रद्द केल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.

आवंढी येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत  नागरिकांच्या तक्रारीवरून केलेल्या तपासणीत दुकानदारांने अनाधिकृत साठा केलेला 800 किलो तांदूळ जप्त केला होता.त्याशिवाय दुकानात 220 किलो धान्य शिल्लक आढळून आले होते.लॉकडाऊन काळात गरीबासाठी आलेला मोफत तांदुळ,स्वस्तधान्य हडप करण्याचा प्रकार येथे घडला होता.त्याशिवाय रेशकार्डवर कमी धान्य देणे,शासनाने ठरविलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारणी केली जात असल्याच्या तक्रारदारी महसूल प्रशासनाकडे आल्या होत्या.त्यानुसार दुकानातील रजिस्टर तक्रारदारांची रेशनकार्ड यांची तपासणी केली होती.यात

अनेक गोष्टी संशास्पद वाटल्याने रितसर पंचनामा करून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता.जिल्हाधिकारी डॉ.चौधरी यांनी अखेर या दुकानाचा परवाना रद्दचा केल्याचे आदेश काढले आहेत.

जत तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  स्वस्त धान्य,मोफत तांदुळ काही स्वस्तधान्य दुकानदारांकडून हडपण्याचे उद्योग अनेक गावात होत आहेत.त्यांना आंवढीतील या कारवाईने दणका बसणार आहे. यापुढे रेशनकार्ड धारकांची एकही तक्रार येणार नाही. यांची काळजी धान्य दुकांनदारांनी घ्यावी,अन्यथा कारवाई अटळ असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.


 

 

 Blogger द्वारे प्रायोजित.