Header Ads

कोरोना | अंकले आरोग्य विभागाच्या निगरानीखाली | वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तळ ; सर्व गावकऱ्यांची तपासणी |


डफळापूर,वार्ताहर : अंकले (ता.जत) येथे कोरोना बाधित रुग्ण सापडताच सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.


या रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.जत तालुक्यात पहिला रुग्ण अंकले येथून समोर आल्याने तालुक्यातील सर्व अधिकारी अंकले येथे ठाण मांडून आहेत.


प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी येरेकर,प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील, पोलिस निरिक्षक रामदास शेळके सह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी,जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील उपस्थित आहेत.आज दुसऱ्यादिवशी गावात औषध फवारणी करण्यात आली आहे. आज सकाळ पासून आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी,सा.वैद्यकीय अधिकारी,11 आशा वर्कर,5 नर्स,आरोग्य कर्मचारी 3,अंगणवाडी 6,मंडळ अधिकारी,ग्रामसेवक,तलाठी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी असे सुमारे 50 कर्मचारी गावातील घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करत आहेत.





जिल्हा परिषदेचे विभागाचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद पोरे,डॉ.श्रीरोटे हे अंकलेत ठाण मांडून आहेत.सर्व ठिकाणी कडक तपासणी करण्यात येत आहेत.गाव कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. गावातील कुणालाही गावामध्ये किंवा गावातील कुणालाही बाहेर जाणास मनाई करण्यात आली आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.