Header Ads

जत | दहा व त्यापेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करू नका : धरेप्पा कट्टीमनी |


जत,प्रतिनिधी : जतसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या दहा व त्यापेक्षा कमी पटाच्या प्राथमिक शाळांच्याजवळील शाळा बंद करू नयेत,अशी मागणी शिक्षक समितीचे नेते धरेप्पा कट्टीमनी सर यांनी केली आहे. या संदर्भात आम्ही राज्यपातळीवरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना तसे निवेदन देणार असल्याचेही कट्टीमनी सर यांनी सांगितले.

दहा व दहा पेक्षा कमी पटाच्या शाळा आयडेंटीफाय करून ठेवा, अशी सुचना शालेय शिक्षण विभागाच्या

अतिरिक्त मुख्य सचिवांनी ऑनलाईन 'वेबिनार'मध्ये दिल्या आहेत. त्यामुळे कमी पटांच्या शाळांच्या समावेशनाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सांगली जिल्ह्यात दहा व त्यापेक्षा कमी पटाच्या 121 प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या

112, खासगी अनुदानित 1,खासगी विनाअनुदानित 9 व नगरपालिकेच्या एका शाळेचा समावेश आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 नुसार प्रत्येक बालकाला त्याच्या घरापासून एक किलोमीटरच्या आत प्राथमिक शिक्षण आणि तीन किलोमीटरच्या आत उच्च प्राथमिक उपलब्ध करणे आवश्यक आहे. दहापेक्षा पटाच्या शाळा या ग्रामीण दुर्गम भागातील आहेत.या शाळा बंद झाल्यास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील.

त्यामुळे कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत, अशी मागणी सर्वच शिक्षक समितीसह अन्य संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे. मात्र गेली तीन-चार वर्षे हा विषय शासनस्तरावरून सातत्याने पुढे येत आहे. माहिती मागविली जाते. कमी पटाच्या शाळेच्याजवळील शाळा बंद करण्याचा घाट शासन घालत आहे.या शाळा बंद झाल्यास जतसह जिल्ह्यातील दुर्गम भागातील मुले जवळ शाळा नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने अशा शाळा बंद करू नयेत असेही कट्टीमनी यांनी सांगितले.

 

Blogger द्वारे प्रायोजित.