Header Ads

सांगली | बेदाण्याचे ऑनलाइन सौदे सुरू करा : महेश खराडे


सांगली | सांगली,तासगावमध्ये सद्या कोरोनो मुळे बेदाणा सौदे बंद आहेत त्याचा गैर फायदा काही स्टोरेज मालक घेत आहेत खाजगी खरेदी विक्री करून शेतकऱ्याची लूट करत आहेत ते थांबवून हळद सौद्याच्या धर्तीवर बेदाणा ऑनलाईन सौदे सुरू करावेत,अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे 


खराडे म्हणाले,जिल्ह्यात द्राक्ष शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे यंदा कोरोना मुळे शेवटच्या टप्प्यात द्राक्षाची विक्री झाली नाही.लॉकडाउन मुळे द्राक्ष विक्री करण्यास अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बेदाणा निर्मिती करण्यास प्राधान्य दिले जिल्ह्यात सुमारे एक लाख टन बेदाणा निर्मिती झाल्याचा अंदाज आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  
सांगली जिल्ह्यात 75 ते 80 कोल्ड स्टोरेज आहेत. ही सर्व स्टरेज भरत आली आहेत.सद्या सौदे बंद असल्याने काही स्टोरेज मालक शेतकऱ्याच्या बेदाण्याची चोरून खरेदी करत आहेत.त्यात शेतकऱ्याची लूट सुरू आहे  यामुळे अडत सेस ही बुडतो आहे.शिवाय खाजगी खरेदी/विक्री चालू असताना अडत कमीशन घेणे चूक आहे. तरीही काही जण वटाव  आणि कमीशन ही कट करून घेत आहेत. अगोदरच शेतकरी अडचणीत त्यात कोल्ड स्टोरॅज मालकडून लूट असे प्रकार सुरू आहेत 
शेतकऱ्याची आर्थिक निकड लक्षात घेवून जर स्टोरेज मालक व काही व्यापारी लुटत असतील तर हे थांबविण्यासाठी ऑनलाईन सौदे सुरू करण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा आणि जिल्हा प्रशासनाने त्याला मान्यता द्यावी,अशी मागणी खराडे यांनी केली आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.