Header Ads

जत | दुधेभावीलगतच्या सीमेवर दक्षता | वाळेखिंडी,बेवनूर,नवाळवाडी, प्रतापपूरच्या सीमाबंद,गावे लॉकडाऊन |


जत,प्रतिनिधी : कवटेमहाकांळ तालुक्यातील दुधेभावी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने दुधेभावी लगत येणाऱ्या जत तालुक्यातील बेवनूर,नवाळवाडी,वाळेखिंडी,प्रतापूर गावाच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.दक्षता म्हणून गावे लॉकडाऊन केली आहेत,अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.

दुधभावी लगत येणाऱ्या तालुक्यातील  गावासह संपुर्ण तालुक्यात सतर्कता बाळगण्यात आली आहे.कोणत्याही प्रकारे गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे.संबंधित गावातील ग्रामपंचायतीने उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्या गावात पुन्हा औषध फवारणी,सह स्वच्छता,सोशल डिस्टसिंग या बाबीची काळजी घ्यावी,कोणत्याही प्रकारे संशय वाटल्यास लगतचे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा,असे आवाहन तहसीलदार पाटील यांनी केले.

Blogger द्वारे प्रायोजित.