Header Ads

पुर्व भागातील पाणी स्रोत अखेरीला | शेती पुन्हा अडचणीत ; पिण्याच्या पाण्याचेही हाल






 

 


 

जत,प्रतिनिधी : कायम दुष्काळ पाचवीला पुजलेल्या जत तालुक्यात या वर्षीही पिण्याच्या पाणी टंचाईबरोबर शेतीच्या प्रश्न गंभीर बनला आहे.पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे.त्यामुळे पुर्व भागातील द्राक्ष,डाळिंब बागांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.

वळीवाचा एकादा दमदार पाऊस पडेल याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.जत तालुका कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखले जातो.तालुक्यातील शेतकऱ्यांना द्राक्ष,डाळींब,कलिंगड,बागायती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.मात्र मार्च,एप्रिल,मे या महिन्यात उभ्या पिकांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे.या काळात पाणी पातळी खोलवर जात असल्याने पाण्याची टंचाई कायम राहते.त्यामुळे बागा जगविण्यासाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

 




जत तालूक्यातील शेतकरी सुरेश गुरूबसप्पा कोट्याळ रा.संख यांचे 3 एकर द्राक्ष बाग व 2 एकर डाळींब बाग जगवण्यासाठी टँकरच्या साह्याने पाच किलोमीटर अंतरावरून पाणी आणून विहिरीत साठा करून ते पाणी बागांना सोडावे लागत आहे.एका टँकरची खेप 1300 रुपये प्रमाणे सुमारे 8 खेपाचे दररोज दहा हजार रूपयाचे पाणी बागेसाठी घ्यावे लागत आहे.गेल्या पंधरा दिवसापासून या पाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.वर्षाला पाण्यासाठी दिड लाख खर्च येतो,पाऊस लांबला तर त्यात पुन्हा खर्चचा आकडा वाढतो आहे.अशी पुर्व भागातील जवळपास सर्वच बागायतदार शेतकऱ्यांची अवस्था आहे.

सर्वाधिक फटका पुर्व भागातील शेतकऱ्यांना बसतो आहे.या भागातील नदीपात्रे,कोरडे,तलाव,कुपनलीका जानेवारी पासूनच अखेरीला येतात.मार्चपासून पाणी स्रोत बंद पडून शेती अडचणीत येत आहे. दरवर्षी ही परिस्थिती आहे.या पाणी टंचाईला दोन हात करत बोटावर मोजण्याऐवढे शेतकरी टिकून राहतात.अनेकजण कर्जबाजारी होऊन पैशा अभावी पिके अर्ध्यावर सोडून देत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत.दुसरीकडे शेती अडचणीत आसल्याने शेतमजूरांच्या हाताला काम नसल्याने त्यांची उपासमार होत आहे.

 

जत पुर्व भागातील द्राक्षांची पाण्याअभावी फुट थांबली आहे.

 

 


 




 

Attachments area

 


 



 



Blogger द्वारे प्रायोजित.