Header Ads

सांगलीत एकाच दिवशी पाच रुग्ण,जिल्हा रेडझोनमध्ये

 
सांगली : जिल्ह्यात आज  पुन्हा पाच नवे रूग्ण सापडल्याने रुग्णाची एकूण संख्या 17 झाली आहे.त्यामुळे शासनाच्या नियमानुसार सांगली जिल्हा पुन्हा रेड झोन’मध्ये गेला आहे.साळशिंगे येथे गुजरातमधील अहमदाबाद मधून आलेल्या कोरोनाबाधित महिलेचा आठ वर्षाचा पुतण्या आणि त्याच्या संपर्कात आलेले भिकवडी खुर्द मधील तब्बल तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.आता साळशिंगे या एकाच गावात तिघे कोरोना पॉझीटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.त्याशिवाय कुपवाड येथील लक्ष्मीनगर येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे.परिणामी जिल्ह्यातील  रुग्णांची 17 झाली.

 

Blogger द्वारे प्रायोजित.