Header Ads

जतेत मद्यपीचा हिरमोड | शासन परवानगीनंरही दुसऱ्यादिवशीही वाईन बंदच 

जत,प्रतिनिधी :कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असलेली राज्यात वाईन शॉप सुरु करण्याची परवानगी देण्यात आल्याने जत शहरातही मद्यपी खुशीत होते.मात्र जत शहरात असणारी दोन वाईनशॉपची दुकाने परवानग्या,व शहरातील मुख्य चौकात असल्याने शासन परवानगीनंतर दुसऱ्यादिवशीही बंद होती.त्यामुळे मद्यपीचा मोठा हिरमोठ झाला.

जत शहरात फक्त दोनच वाईन शॉप आहेत.त्यात त्यांचा मार्च एंड नंतरचा परवाना नुतनीकरण झालेले नसल्याचे सांगण्यात आले.तर दुसरीकडे जत पोलीसांनी ही दुकाने लोकवस्तीत असल्याने चालू करता येणार नाहीत,असा पवित्रा घेतल्याने दुसऱ्यादिवशीही ही वाईनशॉप सुरू झाली नाही.शहरातील बाजार समितीसमोरील एका वाईन शॉपसमोर गर्दी होऊ नये म्हणून बँरीगेट लावण्यात आले आहे.दरम्यान मद्यपी दिवसभर हेलपाटे घालताना दिसत होते.

 

एका वाईन शॉपसमोर अशी गर्दी रोकण्यासाठी केलेली व्यवस्था


 


Blogger द्वारे प्रायोजित.