Header Ads

दि.सांगली सँलरी अर्नर्स को.ऑप.सोसायटीच्या चेअरमनपदी अभिमन्यू मासाळ







जत,प्रतिनिधी : जलसंपदा विभाग जतचे शाखा अभिंयते अभिमन्यू मासाळ यांची दि.सांगली सँलरी अर्नर्स को.ऑप सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाली.
सांगली,कोल्हापूर,सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या शंभर वर्ष पुर्ण केलेल्या या सोसायटीच्या चेअरमनपदी जत तालुक्यातील अधिकारी असणारे मासाळ यांना सँलँरीच्या नेत्यांनी काम करण्याची संधी दिली आहे.

गेल्या पाच वर्षापासून श्री.मासाळ हे या सोसायटीचे संचालक म्हणून काम पाहत आहे.जत शाखेचे शाखाध्यक्ष म्हणूनही ते सध्या काम पाहत आहेत.गेल्या सुमारे पंचवीस वर्षापासून जलसंपदा विभागाच्या जत शाखेत शाखाधिकारी म्हणून काम करत आहेत.त्यांच्या कार्यांची दखल घेत आज सांगली येथे झालेल्या बैठकीत त्यांची चेअरमनपदी तर,प्रकाश गुणवंत पाटील यांची व्हा.चेअरमन पदी निवड करण्यात आली.

दि.सँलरी अर्नर्स ही 1920 साली स्थापना झालेली सोसायटी आहे.जलसंपदा,महसूल,सार्वजनिक बांधकाम,सार्वजनिक आरोग्यसह शासनाच्या सुमारे 44 विभागाचे साडे नऊ हजार कर्मचारी या सोसायटीचे सभासद आहेत.250 कोटीवर दरवर्षी उलाढाल असलेल्या या सोसायटी कडून 200 कोटीचे कर्ज वाटप केलेले आहे.सोसायटीत 175 कोटीच्या ठेवी आहेत.सांगली,कोल्हापूर,सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या सोसायटीच्या 10 शाखा कार्यरत आहेत.या सर्वात जुन्या सोसायटीच्या पुढील एक वर्षासाठी अभिमन्यू मासाळ यांना चेअरमनपदी संधी देण्यात आली आहे.

 

 


  • जतसाऱख्या भागात काम करणाऱ्या माझ्या सारख्या अधिकाऱ्यांवर संस्थेच्या चेअरमनपदी संधी देऊन सँलँरीच्या नेत्यांनी विश्वास दाखविला आहे.यापुढे पारदर्शी काम करत माझ्यावर टाकलेल्या विश्वास सार्थकी लावत सोसायटीच्या नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहीन,असे निवडीनंतर बोलताना अभिमन्यू मासाळ म्हणाले.


 

 

सांगली : द सँलँरी अर्नर्स सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल अभिमन्यू मासाळ व व्हा.चेअरमन प्रकाश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

 



 


 

Blogger द्वारे प्रायोजित.