Header Ads

जत | सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन, चार वाहनावर कारवाई 



 







 

जत,प्रतिनिधी : लॉकडाऊन शिथील होताच जत शहरात एकदम गर्दी उसळली होती.दुसऱ्या दिवशीही गर्दी झाल्याने जत पोलीसांनी वाहतूकीस कोंडी केल्याप्रकरणी चार खाजगी वाहनावर कोरोना प्रतिबंध, वाहतूक कोंडी अतर्गंत गुन्हे दाखल केले.
जत शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे.देशात पुन्हा 17 मेपर्यत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. मात्र काही अत्यावश्यक सेवेच्या दुकांनाना सुट दिली आहे.याचा गैरफायदा घेत दुकानदार व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग नियम पायदळी तुडवत बेशिस्त गर्दी केली.त्यातच वाहने रस्त्यावर लावण्यात आली होती.अशी वाहने पोलीसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली.त्यात एक सोलापूर जिल्ह्यातील लंवगीतून आलेली कुल्झर गाडीही ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे वाहन वैद्यकीय तपासणीच्या कारणावरून तेथील संरपचाच्या परवानगीचे पत्र जोडून शहरात फिरताना पोलीस निरिक्षक रामदास शेळके यांनी ताब्यात घेत कारवाई केली आहे.

 

गर्दी केल्यास कारवाई 

 

कोरोनाचा अद्याप प्रभाव कायम असून लॉकडाऊन काळात दिलेल्या शितीलचा गैर अर्थ काढून व्यापाऱ्यांनी गर्दी केल्यास कारवाई अटळ आहेत.विना परवानगी असलेल्या वाहनावर कारवाई करण्यात येईल कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंग नियम तुटता कामा नये.

 

रामदास शेळके, पो.नि.जत




 


Blogger द्वारे प्रायोजित.