Header Ads

कोरोनाची बैठक दोन महिन्यानंतर | जत नगरपरिषदेचा अजब कारभाराची चौकशी करा : विजय ताड


 

 

जत,प्रतिनिधी : कोरोना महामारी सुरू होऊन दोन महिने संपत आल्यानंतर जत नगरपरिषदेने रवीवारी बैठक बोलवून बेजबाबदार कारभाराचा नमुना पुन्हा समोर आणला आहे.कोरोनाचा प्रभाव वाढून दोन महिने झाल्यानंतर नगरपरिषदेला दोन महिन्यानंतर बैठक घेण्याचे शहाणपण सुचले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय ताड यांनी केला आहे,त्यामुळे या बैठकीवर आम्ही बहिष्कार टाकल्याचेही ताड यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील अशी एकमेव नगरपरिषद असेल की जी विरोधी पक्षनेता आणि नगरसेवकांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊन काम करत आहे. कोरोना महामारी मध्ये सध्या केंद्र,राज्य शासन गंभीर होऊन महाराष्ट्रासह देश लॉकडाउनचा सामना करत आहे,पण जतची नगरपरिषदचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा हुकूमशाही,मनमानी पद्धतीने भोंगळ कारभार रेटत आहेत.

लॉकडाऊन 22 मार्च पासून चालू झाले आहे,तेंव्हा पासून कोणत्याही नगरसेवकाला नगरपरिषद कोणकोणत्या उपाययोजना करत आहे. याबाबत कधीही विश्वासात घेतले नाही.कोणतीही बैठक अथवा माहिती दिली नाही.असा कारभार करत मुख्याधिकारी व नगराध्यक्षा जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

गेल्या दोन महिन्यापासून नगरपरिषदेच्या वतीने केलेली औषध फवारणी ही केवळ दिखावा केला आहे. या औषधाने जंन्तू मेले का नाही हा संशोधनाचा मुद्या आहे.मात्र अशी दिखाऊ कामे रेटून वरकमाई करण्याचा उद्योग सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप विजय ताड यांनी केला आहे.

 

 

कोरोना प्रभाव सुरू होऊन दोन महिन्यानंतर घेतलेल्या या बैठकीवर आम्ही बहिष्कार टाकला आहे.अशा बैठका घेऊन सत्ताधाऱी काय दिवे लावणार आहेत,हे जगजाहीरच आहे,असेही ताड यांनी सांगितले.

 

 

 

 
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.