Header Ads

डफळापूर आजपासून पाच दिवस संपुर्ण लॉकडाऊन
 

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर पासून सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अंकले येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने डफळापूर आजपासून पाच दिवस संपुर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.मेडिकल, दवाखाने ठरलेल्या वेळेपर्यत सुरू राहणार आहेत.बँका,दुध डेअऱ्या,पेट्रोल पंपही बंद ठेवण्यात आले आहेत.

डफळापूरशी अंकलेतील नागरिकांचा मोठा संपर्क असतो.त्यामुळे भविष्यात धोका होऊ नये यासाठी मंडळ अधिकारी तांबोळी, ग्रामविकास अधिकारी एस.एस.कोरे,तलाठी भोसले,पदाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.कोणत्याही प्रकार संसर्ग वाढू नये यासाठी हि दक्षता घेण्यात आली आहे.

या पाच दिवसाच्या काळात नागरिकांनी घराबाहेर न पडता,प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन ग्रामविकास अधिकारी एस.एस.कोरे यांनी केले.


 

   

 
Blogger द्वारे प्रायोजित.