Header Ads

कोरोनाचा प्रवेश : जतेत सतर्कता 


 

जत,प्रतिनिधी : गेल्या दीड महिन्यापासून प्रशासनाच्या अथक परिश्रमामुळे जत तालुक्यात एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नव्हता.त्यामुळे कोरोनाचे परिणाम जत तालुक्यातील नागरिकांच्या लक्षात आलेले नाहीत.गेल्या दीड महिन्यापासून अनेक गावात बाहेरून आलेल्या नातेवाईकांना काही नागरिकांनी प्रवेश दिला आहे. अजूनही चोरी,चुपके काहीजण गावागावत घुसत आहेत. त्याचा फटका तालुक्यात रात्रन् दिवस परिश्रम करणाऱ्या यंत्रणेला बसला.
सर्वप्रकारे खबरदारी घेत प्रांताधिकारी प्रंशात आवटे,तहसीलदार सचिन पाटील,पो.नि.रामदास शेळके,दत्तात्रय कोळेकर, अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ,बिडिओ अरविंद धरणगुत्तीकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांना दीड महिने चांगल्या प्रकारे कोरोनाला रोकण्याचे प्रयत्न केले.गेल्या चार दिवसापुर्वी शासनाच्या बाहेरील, परराज्यातील नागरिकांना घरी परत आणण़्याचे धोरणामुळे धोका बळावला होता.गेल्या चार दिवसापासून कमालीची दक्षता घेतली जात होती.कर्नाटकाच्या उमदी, कोतेबोंबलाद,उमराणी,गुगवाड,शेळकेवाडी नजिकच्या सिमेवर चेकपोस्ट,वैद्यकीय पथक तैनात करून खबरदारी घेतली जात आहे. मात्र मुंबईकडून जतला धोका झाला आहे. मुंबईहून कोरोनाचा जत तालुक्यात प्रवेश झाला आहे.अंकलेतील एका जणामुळे धोका वाढला आहे.यांची संपर्कातील व्याप्ती आरोग्य विभागाकडून तपासण्या़त येणार आहे

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.