Header Ads

जत | दिनकर पंतगे यांची लायन्सच्या झोन चेअरमनपदी निवड |


जत,प्रतिनिधी : जतचे शिवसेना नेते,सेवानिवृत्त कृषी अधिकारी दिनकर पंतगे यांची लायन्स क्लबच्या झोन चेअरमनपदी निवड झाली.
गेल्या दोन वर्षापासून ते जत लायन्स क्लबचे अध्यक्ष होते.सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी लायन्सच्या माध्यमातून तालुक्यात प्रभावी काम केले आहे. सध्या कोरोना काळात त्यांनी सुमारे दोन हजार नागरिकांना मास्क,सँनिटायझर, जीवनावश्यक वस्तूचे वाटप करत लायन्सची सामाजिक बांधिलकी कायम ठेवली आहे.या कामाचा गौरव करत त्यांना झोन चेअरमनपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता सांगली जिल्ह्यातील चार क्लबवर्ती ते अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
  • यापुढेही समाजाच्या हितासाठी,सामाजिक स्तर उंचविण्यासाठी विविध मार्गातून उपक्रम राबवित माझी जबाबदारी समर्थपणे पेलण्याचा प्रयत्न करेन

  • - ला.दिनकर पंतगे
    झोन चेअरमन, लायन्स क्लब


Blogger द्वारे प्रायोजित.