Header Ads

संख | भागातील डॉक्टरांना राष्ट्रवादी पक्षाकडून पीपीई किटचे वाटप 
 


 

जत,प्रतिनिधी ; संख भागातील डॉक्टरांना राष्ट्रवादी पक्षाकडून व शासनाकडून जास्ती जास्त ग्रामीण भागातील डॉक्टरांना अधिका अधिक सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करू,असे प्रतिपादन जि.प.चे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.

ते संख परिसरातील डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप प्रंसगी बोलत होते.माजी जि.प.उपाध्यक्ष मा.बसवराज पाटील यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले. 

 

 

बसवराज पाटील पुढे म्हणाले कि,जत पूर्व भाग दुष्काळी असल्यामुळे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कोणत्याही सुविधा उपलब्ध होत नाही.कोरोनाच्या या महामारीत डॉक्टरांना सुरक्षिकता महत्वाची आहे.राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कानावर ही परिस्थिती जाताच त्यांनी जत तालुक्यातील डॉक्टरांना ही किट उपलब्ध करून दिली आहेत.या किटमुळे ग्रामीण भागातील डॉक्टरांना कोरोनाच्या लढाईत लढण्याची ताकत मिळेल.भविष्यातही ग्रामीण भागातील डॉक्टरांना कोरोनाच्या या लढाईत राष्ट्रवादीच्या माध्यमातून मदत करू,असेही पाटील यांनी सांगितले.

यावेळी निलबिंका बसवेश्वर शिक्षण  संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष पाटील,दयगोंडा बिरादार,पोलिस पाटील सुरेश पाटील,संख प्राथमिक आरोग्य केद्रचे डॉ.स्नेहल सावंत,डॉ.व्हनखंडे व पुर्वभागातील खाजगी व शासकीय डॉक्टर उपस्थित होते.

 

 

संख परिसरातील डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप करताना बसवराज पाटील व मान्यवर


 

  

Blogger द्वारे प्रायोजित.