Header Ads

जिल्ह्याबाहेरून विना परवाना नागरिकांची वाहतूक | आंवढीच्या टेम्पो चालकावर गुन्हा दाखल | तालुक्यात धोका वाढला


छायाचित्र, प्रतिकात्मक


 


जत,प्रतिनिधी : बाहेरून आलेल्या नागरिकांकडून जत तालुक्यात कोरनाचा फैलाव वाढण्याची शक्यता वाढली आहे.गेल्या दीड महिन्यापासून तालुक्यातील परिस्थिती प्रशासनाच्या हातात आहे.मात्र गेल्या आठवड्यापासून तालुक्यातील कोरोना प्रभाव असलेल्या मुंबई,पुणे,सोलापूरसह परराज्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक तालुक्यात येत आहेत.त्यांना होम क्वॉरंटाईनमध्ये राहण्याचे सक्त आदेश असतानाही असे नागरिक बेधडक गावात वावरत असल्याने कोरोनाचा तालुक्यात फैलाव वाढू लागला आहे.गेल्या आठवड्यात अंकले येथे मुंबईहून आलेले दोघेजण कोरोना बाधित सापडले आहेत.तर गुरूवारी वाळेखिंडी येथेही मुंबईहून आलेल्या एका तरूण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या ढिलाईने तालुक्यात शेकडो नागरिक बेधडक प्रवेश करत आहेत.त्यात मुंबई येथून येणारी संख्या मोठी आहे.त्यांना वेळीच न रोखल्याच जतेत कोरोनाचा मोठा फैलाव होण्याची शक्यता आहे.


राजकीय हस्तक्षेप


तालुक्यातील अनेक गावात प्रशासनाकडून अशा नागरिकांना संस्था क्वारंनटाईन करत गालातील शाळात क्वॉरंटाईनमध्ये ठेवले होते.मात्र स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना घरी पाठविण्याचे प्रकार घडले आहेत.अशातील एकादा कोरोना बाधित सापडला तर मोठा धोका होणार आहे.


 


आंवढीतील एक टेम्पो चालकावर गुन्हा दाखल


जत तालुक्यातील आंवढी येथील एका मालवाहतूक टेम्पो चालकांने विना परवाना बाहेरून नागरिक आणल्यामुळे त्यांच्यावर जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या टेम्पो चालकांने आंवढी परिसरासह लगतच्या सांगोला तालुक्यातील बाहेरून अनेक नागरिकांना आणल्याचे समोर आले आहे. त्यांच्या टेम्पोसह त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.


 


Blogger द्वारे प्रायोजित.